खूप खेळा निरोगी रहा - माजी विद्यार्थी प्रदीप क्षत्रिय
नाशिक एज्युकेशन सोसायटी चा क्रीडा महोत्सव उत्साहात
नाशिक -खूप खेळा निरोगी रहा खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध वकील तथा कर सल्लागार प्रदीप क्षत्रिय यांनी केले
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा समिती मार्फत आयोजित संस्थास्तरीय माध्यमिक विभागाचा सीडीओ, मेरी हायस्कूल येथे क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी क्षत्रिय हे बोलत होते पुढे ते म्हणाले निरोगी शरीरासाठी आपल्याला व्यायाम केले पाहिजे व खेळलीही पाहिजे खेळामुळे शिस्त ,परिश्रम संघ भावना, नेतृत्व यासारखे गुण वाढीस लागतात यावेळी अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था उपाध्यक्ष जयदीप वैशंपायन तसेच क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी हे होते यावेळी व्यासपीठावर नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, क्रीडा समिती निमंत्रक तथा मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, उमेश कुलकर्णी, पंढरीनाथ बिरारी, संस्था कार्यकारणी सदस्य सरोजिनी तारापूरकर ,रंजना परदेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी हनुमानाचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले व क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे सर्व मान्यवरांनी स्वागत केले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र हत्ते यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय शैलेश पाटोळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक पुंडलिक शेंडे यांनी केले तर आभार पंढरीनाथ बिरारी यांनी मानले याप्रसंगी जयदीप वैशंपायन यांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्व सांगितले तर कार्यवाह राजेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेत १०० मीटर धावणे, दोर उडी, मेडिसिन बॉल थ्रो, लंगडी पळी,शटल रन, जंप रोप आदी विविध खेळांमध्ये संस्थेच्या सर्व मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे सर्व खेळाडू सहभागी झाले होते
दुपारी क्रीडा पारितोषिक समारंभ हा नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी व्यासपीठावर संस्था कार्यवाह राजेंद्र निकम ,क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी, क्रीडा समिती निमंत्रक तथा मुख्याध्यापक राजेंद्र कापसे , सहकार्यवाह शैलेश पाटोळे ,उमेश कुलकर्णी ,पंढरीनाथ बिरारी, सरोजिनी तारापूरकर, शिक्षक मंडळ अध्यक्ष नंदा पेठकर, रंजना परदेशी संस्थेच्या मराठी इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक विभागाचे सर्व मुख्याध्यापक नंदिनी कहांडळ, नरेंद्र मोहिते, विलास बैरागी, सुनिता कासार वर्षा कऱ्हाखेडकर, सरिता देशपांडे, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
याप्रसंगी महोत्सवात झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच राज्य राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या संस्थेच्या खेळाडूंचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊ सत्कार करण्यात आला स्पर्धेत सर्वात जास्त बक्षीस मिळवलेल्या माध्यमिक विभागातील जनरल चॅम्पियनशिप इंग्लिश मिडीयम स्कूल उंटवाडी शाळेस चषक मिळवण्याचा मान मिळाला क्रिकेट मुले व मुली चॅम्पियनशिप माध्यमिक विद्यालय उंटवाडी या शाळेस मिळवण्याचा मान मिळाला याप्रसंगी त्यांना करंडक देऊन सन्मान करण्यात आला सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना व संघांना संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी तसेच उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी शुभेच्छा दिल्या संस्था क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेतील सर्व क्रीडाशिक्षक व संघ व्यवस्थापक नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpg)