ओझर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल मत्सागर भारतीय सैन्य दलात भरती
म.वि.प्र. समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझरमिग या महाविद्यालयाचा बी.एस्सी. चा विद्यार्थी साहिल राजेंद्र मत्सागर याची एप्रिल २०२५ ला भारतीय सैन्य दलात निवड झाली. त्याने नुकतेच ०३ डिसेंबर २०२५ ला मराठा लाईट इनफंट्री रेजिमेंट सेंटर, बेळगाव, कर्नाटक येथे आठ महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्याची जानेवारी २०२६ पासून केदारनाथ, उत्तराखंड येथे सात मराठा बटालियनमध्ये नियुक्ती झाली आहे.
साहिल राष्ट्रीय खेळाडू असून त्याने अॅथलेटीक्स, क्रॉसकंट्री, मॅरेथॉन स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. तसेच एन.सी.सी. कॅडेट देखील होता.
साहिल एका गरीब शेतकरी कुटुंबातील होतकरू, कष्टाळू, मेहनती खेळाडू आहे. अत्यंत खडतर प्रवासातून गेल्या २-३ वर्षापासून सैन्य दलात जाण्याचा सराव करत होता. त्यात तो यशस्वी झाला. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.डी.लोखंडे यांनी साहिलचे अभिनंदन व पुढील देशसेवे करीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.डी.एस.बोराडे, क्रीडा संचालक डॉ. दिपक सौदागर, प्रा.पी.व्ही.खाडे व श्री सातपुते भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
