वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात

 वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण 



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित नूतन मराठी शाळा व बालमंदिर इगतपुरी आणि महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी येथे दरवर्षा प्रमाणे ह्या वर्षी ४६वी 'वा. श्री. पुराहित नाट्यस्पर्धा' तसेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

       वा. श्री. पुरोहित नाट्यस्पर्धेत नूतन मराठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती नंदिनी शेवाळे लिखित व दिग्दर्शित केलेले 'आजी २.०' व एम जी हायस्कूलच्या शिक्षिका पानसरे मॅडम लिखित व दिग्दर्शित केलेले 'तू चाल पुढं' या दोन एकांकिका सादर झाल्या.

       नाट्यस्पर्धेनंतर पुढील दोन दिवस वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिमाखात पार पडला.

       नाट्यस्पर्धेसाठी सहाय्यक दिग्दर्शन म्हणून शाळेचे शिक्षक श्री. धीरज राणे यांनी काम पाहिले तर स्नेहसंमेलनासाठी सुत्रसंचलनाची धुरा श्री. धीरज राणे व श्रीमती उषा शिरसाठ मॅडम यांनी सांभाळली.

       सदर उपक्रमासाठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा क्षत्रीय मॅडम, शाळेचे अधिक्षक प्रसाद चौधरी सर, शालेय समितीचे अध्यक्ष अशोक शेठजी नावंदर, यांचे सहकार्य लाभले.

Previous Post Next Post