खेळामुळे सहकार्याची भावना विकसित होते = माजी विद्यार्थी प्रदीप अहिरे

 खेळामुळे सहकार्याची भावना विकसित होते = माजी विद्यार्थी प्रदीप अहिरे 


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 


ओझर-खेळ आत्मविश्वास वाढवून संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढवून सामाजिक कौशल्य सुधारतात खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होती असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तथा शाळेचे पालक शिक्षक संघ कार्याध्यक्ष प्रदीप अहिरे यांनी केले 

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते पुढे ते म्हणाले निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे समाज घडवितात आणि निरोगी समाज हा निरोगी देश घडवितो यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे शाळा समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजा वर्टी हे होते. व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कांचन जाधव, आनंद खैरे, पालक शिक्षक संघाचे हिशोब तपासणीस रमेश कदम, 

उपस्थित होते. प्रारंभी हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली क्रीडा ज्योतीचे उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वागत केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व सत्काराचे निवेदन शाळेचे शिक्षक प्रतिनिधी तथा नाएसो संस्था सहकार्यवाह डॉ .उमेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रदीप अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मैदानी खेळ खेळण्याने शरीर स्वस्थ राहते शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते मैदानी खेळाचे महत्त्व अतुलनीय आहे हे विविध उदाहरणांवरून विद्यार्थ्यांना पटवून दिले शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सव च्या शुभेच्छा दिल्यात तर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कांचन जाधव यांनी विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व कसे आहे हे उदाहरण देत पटवून दिले तसेच मोबाईल पासून दूर राहा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष राजा वर्टी यांनी क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात सूत्रसंचालन गीता दामले यांनी केले. यावेळी विविध सांघिक वैयक्तिक खेळ घेण्यात आले पंच म्हणून शाळेच्या शिक्षकांनी कामगिरी बजावली यावेळी शाळेतील शिक्षक मच्छिंद्र गाडेकर, गीता दामले, संगीता वळवी, सुहानी पवार शाळेतील लिपिक हरिभाऊ बागुल, चंद्रभान गायकवाड, योगेश बंदरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post