नाशिक एज्युकेशन सोसायटी शिशुवृंद व प्राथमिक विभागाचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न

 नाशिक एज्युकेशन सोसायटी शिशुवृंद व प्राथमिक विभागाचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न    



 
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

दि.१८/१२/२०२५

नाशिक प्रतिनिधी:नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा स्पर्धा समितीमार्फत आयोजित संस्थास्तरीय शिशुवृंद व प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा महोत्सव प्राथमिक विद्यालय , उंटवाडी येथे संपन्न झाला.सकाळसत्रात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी डॉ.सतीश पापरीकर (बॅडमिंटनपटू),संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ॲड.जयदीप वैशंपायन, संस्था कार्यवाह राजेंद्र निकम ,क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी , क्रीडा समिती निमंत्रक राजेंद्र कापसे यांच्या उपस्थितीत तर संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय तृप्ती बडगुजर यांनी करून दिला.स्वागत प्रास्ताविक उंटवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी दीपमाला चौरे यांनी केले तर आभार क्रीडा समिती सहनिमंत्रक अशोक शिरुडे यांनी मानले.प्रमुख पाहुणे डॉ.सतीश पापरीकर यांनी आपल्या मनोगतातून खूप खेळा,निरोगी रहा हा मोलाचा सल्ला दिला.संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे,कार्यवाह राजेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.धावणे,दोर उडी,मेडिसीन बॉल थ्रो,लंगडी पळी, शटल रन आदी विविध खेळांमध्ये संस्थेच्या सर्व शाळांचे सर्व खेळाडू सहभागी झाले होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्था कार्यवाह राजेंद्र निकम,संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, उमेश कुलकर्णी, पंढरीनाथ बिरारी,समिती सहनिमंत्रक अशोक शिरुडे ,प्राथमिक विद्यालय उंटवाडी च्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे, कोठारी शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी कस्तुरे, इंग्लिश मिडीयम स्कूल उंटवाडीच्या मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, रंगुबाई जुन्नरे प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्याणी अग्निहोत्री , माँटेसरी च्या मुख्याध्यापिका स्मिता वाळवेकर,संस्थेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते. .याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महोत्सवात झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बक्षीसप्राप्त विद्यार्थी यादी वाचन चिन्मय देशपांडे यांनी केले.सर्वात जास्त बक्षीस मिळवल्याबद्दल शिशुवृंद विभागातील शिशु सागरमल मोदी शालिमार या शाळेस कै. रुख्मिणीबाई दुधारे जनरल चॅम्पियनशिप तर प्राथमिक विभाग प्राथमिक विद्यालय उंटवाडी , या शाळेस जनरल चॅम्पियनशिप फिरता चषक मिळविण्याचा मान मिळाला तर उपविजेता ट्रॉफी कै.पुजाराम फकिरा ठाकरे चषक सागरमलमोदी प्राथमिक विभाग त्यांना करंडक देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा समिती अध्यक्ष राज वर्टी यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी संस्थेतील सर्व क्रीडाशिक्षक व संघ व्यवस्थापक , संस्थेच्या प्राथमिक , माध्यमिक शाळेतील शिक्षक , विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post