स्काऊट गाईड चळवळीतून आदर्श नागरिक घडतात - प्रशांत दिग्रसकर
(सात दिवसीय स्काऊट गाईड प्रगत प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन)
नाशिक -शालेय जीवनापासून चांगल्या सवयी स्वयंस्फूर्त शिस्त , देशप्रेम,साहस,हस्तकला व दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती मुला मुलींमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे या दृष्टिकोनातून नाशिक भारत स्काऊट गाईड चे प्रशिक्षण व उपक्रम प्रशंसनीय आहे विद्यार्थ्यांना स्वच्छता,शिस्त बाबत माहिती होते स्काऊट गाईड चळवळीतून
आदर्श नागरिक घडतात असे प्रतिपादन स्काऊट गाईड चे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक ), नाशिक यांनी नाशिक जिल्हा स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्र येथे स्काऊट गाईड प्रगत प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि.२३ डिसेंबर रोजी केले
स्काऊट गाईड प्रगत प्रशिक्षण हे २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान आयोजित असून यात २५ शिक्षक स्काऊट मास्टर ०२ गाईड कॅप्टन सात दिवसीय प्रशिक्षण घेत आहे
याप्रसंगी नाशिक जिल्हा स्काऊट संघटक श्रीनिवास मुरकुटे,गाईड संघटक कविता वाघ, जिल्हा शिबीर प्रमुख नवनाथ वाघचौरे,उपशिबीर प्रमुख साहेबराव पाटील उपस्थित होते जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षण देणे काळाची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून स्काऊट गाईडचे प्रशिक्षण प्रशंसनीय आहे प्रस्तावना नवनाथ वाघचौरे यांनी केले तर आभार साहेबराव पाटील यांनी मानले

