सी.डी.ओ.मेरी शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ संपन्न

 सी.डी.ओ.मेरी शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ संपन्न


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ना.ए.सोसायटीच्या मेरी हायस्कूल नाशिक या शाळेत शालेय समिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रीती करवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व वैभवी बापट आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक खेळाडू यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.नियमित व्यायाम करा,विविध खेळात यश मिळवा.कोणताही खेळ खेळाडू वृत्तीने खेळा कोणत्याही खेळात हार व जीत होतच असते.खेळाने आपले शरीर लवचिक राहते असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय क्रीडा शिक्षक पुंडलिक शेंडे यांनी करून दिला.याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक चिमण सहारे,पर्यवेक्षक साहेबराव राठोड संस्था सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी,चेतन नेवकर उपविभागीय अधिकारी स्थापत्य विभाग मेरी पा.शि.संघ कार्याध्यक्षा देवयानी सोनार कार्यवाह मंगेश बोढाई,शालेय पंतप्रधान कु.अनुजा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.क्रीडा विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले.सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक रवींद्र नाकील यांनी केले.राज्यस्तरीय खेळाडू यश कडाळे याने खेळाडू विद्यार्थ्याना शपथ दिली.शाळेचे पर्यवेक्षक सुनील घोलप यांनी आभार मानले. शालेय गीतमंच यांनी क्रीडा गीत सादर केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post