माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन उत्साहात
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी हे होते कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मेघा तायडे यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन का साजरा केला जातो याबाबत माहिती दिली तर शाळेचे पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ यांनी मानवी हक्क व आपली कर्तव्य कोणते याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी मानवी हक्कामुळे माणसाला स्वाभिमानाने जगता येते मानवी हक्कांचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे हे मानवी हक्क आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत प्रसारित केले पाहिजे अशी अपेक्षा करत आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मंगला मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले



