सी.डी.ओ.मेरी शाळेत ७७ वा प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा
शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,तसेच त्यांनी उपस्थितांना संविधानाची उद्देशिका दिली व सर्वांना प्रजासत्ताक दिनाचे संदेश देऊन व शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक सुनील घोलप यांनी ध्वज निष्ठेची शपथ दिली तर शिक्षक प्रतिनिधी पंढरीनाथ बिरारी यांनी साक्षरतेची शपथ दिली.
ध्वजारोहण प्रसंगी इ.५ वी, ७वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले.स्काऊट गाईड, RSP, NCC, स्काऊट गाईड या विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर कवायतीचे प्रकार सादर केले.गीतमंच व मराठी,इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी समुहगीते व नृत्य सादर केले व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक पुंडलिक शेंडे व रविंद्र नाकील यांनी केले.कार्यक्रमास शाळेचे उपमुख्याध्यापक चिमण सहारे,पर्यवेक्षक साहेबराव राठोड,इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका वर्षा कराडखेडकर,फरहत शेख प्रायमरी विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका शोभा बच्छाव,प्रमिला दुधारे ज्येष्ठ शिक्षक संजीव वाणी संजय आहेर पा.शि.संघाचे कार्यवाह मंगेश बोढाई व इतर सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
