मॅरेथॉनमध्ये पेठे विद्यालयातील गौरी चौधरीचा धावण्यात प्रथम क्रमांक

 मॅरेथॉनमध्ये पेठे विद्यालयातील गौरी चौधरीचा धावण्यात प्रथम क्रमांक


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी) :नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय, नाशिक येथील खेळाडू गौरी मनोज चौधरी हिने मराठा विद्या प्रसारक मंडळ, नाशिक यांच्या वतीने नुकत्याच आयोजित १० वी राष्ट्रीय व १५ वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शालेय क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला.या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील ३ किमी धावणे या क्रीडा प्रकारात गौरीने प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऑलिम्पिक खेळाडू योगेश वरदत्त यांच्या हस्ते तिला ₹५,००० रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.या उज्ज्वल यशाबद्दल संस्था पदाधिकारी तसेच शालेय मुख्याध्यापक गंगाधर बदादे, 

उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे क्रीडा शिक्षक अमोल जोशी तसेच गुरुजनांनी गौरीचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.गौरीच्या या यशामुळे पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post Next Post