राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धात संदीप भगरे प्रथम
नाशिक:-सांगली येथे( दि.२ डिसेंबर) रोजी झालेल्या राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धात संदीप भगरे यांनी प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवित विजेतेपद पटकावला
शालेय शिक्षण विभाग , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे अधिकारी व शिक्षकांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे सांगली येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्टातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक व अधिकारी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता
संदीप भगरे हे नाशिक येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या
.
