सागरमल मोदी शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
दि.१२/०१/२०२६
(नाशिक वार्ताहर)- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्यवाह व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम उपस्थित होते.
आपल्या भाषणातून पूर्वा परदेशी, दुर्वा शिंदे, आर्वी मोरे, रुद्रायणी कुलकर्णी, दिव्यांशी भारती, ईश्वरी बुलाखे,ज्ञानेश्वरी बडगे,मधुरा ठोंबरे,प्रणाली कामिटे, यज्ञा शेळके, योगेश राठोड * या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास सांगितला.याप्रसंगी जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित नाटिका,गीत व कविता प्रज्ञा झळके,भाग्यश्री गोतरणे,चित्राक्षी अहिरे,मायरा,मुक्ताई घोडके या विद्यार्थिनींनी सादर केली. यावेळी * विश्वांजली चांडक * हिने राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली.तर *आयान* याने स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत होता.अध्यक्षीय मनोगतातून राजेंद्र निकम यांनी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांचे शैक्षणिक कार्य सांगितले. शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे, उषा जोपळे, प्रतिभा बाविस्कर यांनी स्वामी विवेकानंद व जिजामाता यांच्या कार्याची माहिती सांगितली.
या कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रांती बोराटे व तेजश्री बुवा यांनी परिश्रम घेतले. इयत्ता तिसरी *ब,फ,अ* तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या ताजने हिने तर आभार वेदिका वसोकार हिने मानले.सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
