सागरमल मोदी मेरी विभागात पालक शिक्षक संघ आयोजित गुणगौरव समारंभ संपन्न -

 सागरमल मोदी मेरी विभागात पालक शिक्षक संघ आयोजित गुणगौरव समारंभ संपन्न -



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

प्रतिनिधी (नाशिक )- ना. एज्यु. सोसायटी च्या सागरमल मोदी मेरी विभागात पालक शिक्षक संघातर्फे घेतला जाणारा विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या शाळा समिती अध्यक्षा रंजना परदेशी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कन्या कोठारी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे या होत्या. पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा कोमल जोशी आणि सहसचिव विलास धात्रक हे देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. शाळेच्या गीत मंचाने स्वागत गीत सादर केले.शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सातत्यपूर्ण सर्वंकष परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुरेखा बोकडे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम यश टिकवण्यासाठी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना परदेशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली. उपशिक्षक दिपक नंदन यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंद देशमुख, कविता खोटरे व जगदीश कोतवाल यांनी यादी वाचनाचे काम केले. अनघा कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर विभाग प्रमुख विजया दुधारे यांनी आभाराचे काम केले. जवळजवळ 60 विद्यार्थ्यांना याप्रसंगी गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख शालिनी बच्छाव,कविता गजरे, किशोर पारखे आदी शिक्षक - शिक्षकेतर, पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Previous Post Next Post