माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन इ. 6 वी ब,5 वी अ व इ. 8 वी फ च्या विद्यार्थांनी केले त्यांना सहकार्य वर्गशिक्षिका केतकी गोविंद व प्रिया कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, जेष्ठ शिक्षक संतोष देवांग,जेष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदान तसेच शैक्षणिक कार्याबाबत विद्यार्थ्याना माहिती दिली .शालेय विद्यार्थी काव्या देशपांडे, सरस्वती सहानी,चोंडकर दिव्या, वरूणी ठाकरे,केतकी खैरनार,पल्लवी भामरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग याबाबत माहिती सांगितली .
याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे तसेच मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप , पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर , जेष्ठ शिक्षक कैलास पाटील , मंगला मोरे, मिनाक्षी मारवाडी, प्रणाली देशपांडे, मेघा तायडे, चारुशीला पत्की, दिपाली पाटील,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

