पेठे विद्यालयात मैंद शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक (प्रतिनिधी):नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाच्या सभागृहात मैंद शिष्यवृत्ती वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमास खरोटे कॉमर्स क्लासेसचे संचालक विनोद काशिनाथ खरोटे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी जितेंद्र विसपुते व मंजिरी विसपुते यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्रा.दिलीप फडके होते. स्वागत व प्रास्ताविक शैलेश पाटोळे यांनी केले. शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन करताना शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.यावेळी मैंद शिष्यवृत्ती प्राप्त ओझरकर अर्णव, सोनार चिराग, बागुल अनुज, बागुल तेजस, नाशिककर दूर्वेश, बागुल कुणाल, वाघ पुष्कर, दुसाने अथर्व, जगदाळे ओंकार आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपाली रोटवदकर यांनी केले. अतिथी परिचय व सत्कार निवेदन रुपाली ठाकूर यांनी केले. शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमासाठी शर्मिला खाणीवाले मॅडम यांचे सहकार्य लाभले.या समारंभास मुख्याध्यापक गंगाधर बदादे,उपमुख्याध्यापक शरद शेळके,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी,
सहकार्यवाह शैलेश पाटोळे,
पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी कराड मॅडम,माजी मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी केले.

.jpg)