पेठे विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक- पेठे विद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गुड्डी हिरकुड व अवधूत मानकर यांनी केले. विद्यार्थिनी पायल गावित, कार्तिक लष्कर तसेच सोहम रोंगटे, सार्थक अहिरराव, श्रेयस तरसे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर भाषणे सादर केली. ‘मी सावित्रीबाई फुले बोलते…’ या सादरीकरणातून खुशी बोराडे तसेच ,सावित्रीबाई फुले यांच्यावरील ओव्या नंदिनी अहिरे व योगेश्वरी भोये यांनी सादर केल्या. गीत सादरीकरणात पायल गावित, गुड्डी हिरकुड, हेमा गावित तसेच ध्रुव देवरे व समर्थ जाधव यांनी सहभाग घेतला. अस्मिता तसेच जयाद्री जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली.
राजश्री मुळे, रूपाली रोटवदकर , प्रशांत साबळे यांनी शिक्षकीय मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी व उपमुख्याध्यापक शरद शेळके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीप्ती शिरसाट व रूपाली ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले.
