स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी(नाशिक)-नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी मेरी विभागात
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ भोसले जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या विभाग प्रमुख विजया दुधारे व शालिनी बच्छाव यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.
इयत्ता ४ थी ची विद्यार्थिनी आरिया पाथरवट हिने सूत्रसंचालन केले. विविध विद्यार्थ्यांची भाषणे,गाणी, वेशभूषा आदी उपक्रमातून या दिनाचे महत्त्व विशद केले गेले. इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची महती सांगितली.
विभाग प्रमुख सौ.विजया दुधारे यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. तर आरोही भिसे या विद्यार्थिनीने आभाराचे काम केले. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख श्रीमती शालिनी बच्छाव, प्रियंका गांगुर्डे, यशवंत गावित आदि शिक्षक-शिक्षकेतर, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
