पेठे विद्यालयातील चित्रकला परीक्षेतील यश
नाशिक (प्रतिनिधी)-नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट (सन २०२५) चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेत ९ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, ११ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड तर २२ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.तसेच इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेत ९९ टक्के निकालाची नोंद झाली असून १५ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड प्राप्त केली आहे.चित्रकला शिक्षक मनीष जोगळेकर व रुपाली रोटवदकर यांचे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे व संपूर्ण शालेय परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.