माध्यमिक विद्यालय उंटवाडीस शासकीय चित्रकला परीक्षेत यश

 माध्यमिक विद्यालय उंटवाडीस शासकीय चित्रकला परीक्षेत यश 


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

      नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी शाळेस शासनाच्या शासनाच्या शासकीय चित्रकला परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे. 

     विद्यालयाचा एलिमेंटरी चित्रकला परीक्षेचा निकाल शेकडा 99.22 लागला .यामध्ये 17 विद्यार्थ्यांना A ग्रेड ,56 विद्यार्थ्याना B ग्रेड ,54 विद्यार्थांना C ग्रेड मिळाली .तर इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेचा निकाल शेकडा 98.05 लागला .यामध्ये 17 विद्यार्थ्यांना A ग्रेड, 45 विद्यार्थ्याना B ग्रेड ,38 विद्यार्थांना C ग्रेड मिळाली. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील पर्यवेक्षक, शशिकांत दंडगव्हाळ, कला शिक्षक संजय आहीरे यांनी मार्गदर्शन केले होते.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना शुभेच्या दिल्या .

Previous Post Next Post