ओझर महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस व कापरेकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 ओझर महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस व कापरेकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर (मिग) येथे २२ डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन व महान गणितज्ञ डॉ. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या १७ जानेवारी जयंतीनिमित्त दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. विद्यार्थ्यांची गणितामधील भीती कमी व्हावी आणि गणिताची आवड निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य डॉ. डी. पी. पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. लोखंडे सर होते.

कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन प्रा. शरद उगले सर यांनी केले. गणित विभागाच्या विभागप्रमुख विश्वकर्मा मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. यावेळी विज्ञान शाखाप्रमुख डॉ. बोराडे सर, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. कदम मॅडम, कला शाखाप्रमुख डॉ. आवारे सर, रसायनशास्त्र विभागप्रमुख दुशिंग सर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख सरदार मॅडम, संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. फड सर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख देठे सर तसेच पाटील मॅडम, विकास सर, मगर मॅडम, बोरस्ते मॅडम व इतर सहकारी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रमुख अतिथी डॉ. डी. पी. पाटील सर यांनी आपल्या व्याख्यानात महान गणितज्ञ श्रीनिवासा रामानुजन यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये गणिताचे महत्त्व आणि अभ्यासाची योग्य दिशा यावर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. गणेश फड सर यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसा लाभला.

Previous Post Next Post