सागरमल मोदी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 सागरमल मोदी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

दि.०३/०१/२०२६

(नाशिक वार्ताहर)- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित 

सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था कार्यवाह व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम उपस्थित होते. 

आपल्या भाषणातून *रिद्धी नागरे, मुक्ताई घोडके, समीक्षा भडांगे, जान्हवी शेळके, वेदिका वसोकार, रिंकू कांकरिया, आराध्या वाघ, अभिलाषा देवरे* या विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास सांगितला.याप्रसंगी सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित नाटिका,गीत व कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी समूहनृत्य सादर केले. यावेळी *तनिष्का कुलकर्णी* हिने सावित्रीबाईंची वेशभूषा केली.तर *रोहित भोये* याने महात्मा फुलेंच्या वेशभूषेत होता.यावेळी भारतीय यशस्वी महिलांच्या वेषभूषा विद्यार्थिनींनी सादर केल्या.अध्यक्षीय मनोगतातून राजेंद्र निकम यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य सांगितले. शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरचे गीत सादर केले. याप्रसंगी नीलिमा गायधनी उषा जोपळे, राहुल चव्हाण,सारिका सूर्यवंशी,दिपाली पाटील,कविता भामरे ,प्रतिभा बाविस्कर उपस्थित होते. 

 या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत केंदळे, निलेश चव्हाण,कल्पना जोपळे,तेजश्री बुवा यांनी परिश्रम घेतले. इयत्ता तिसरी व चौथी च्या ब व क तुकडीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशा पाईकराव हिने तर आभार *कस्तुरी कुलकर्णी* हिने मानले.सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post