प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे सिकल सेल तपासणी साठी अरुणोदय विशेष मोहीम
ओझर -जिल्ह्यात सिकल सेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर प्रभावी प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याच्या उद्देशाने या अरुणोदय ही विशेष शिखर तपासणी मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर परिसरात, ओझर बाणगंगा नगर, दीक्षि दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, दात्याने बरड येथे आरोग्य कर्मचारी व आशा ताई यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे जिल्ह्यात *15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी* या कालावधीत ही विशेष मोहीम राबवून शून्य0ते 40 वयोगटातीलएकही नागरिक तपासणी पासून वंचित राहणार नाही असा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे सिकल शेल आजार हा अनुवंशिक असून आई-वडिलांपासून होणाऱ्या अपत्यांना होतो सिकल सेल रक्त पेशीचे संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात, तसेच सिकल सेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या व ताठर असतात. सशक्त लाल रक्तपेशी रक्तवाहिन्यातून सरळ निघून जातात परंतु सिकल सेल आजाराच्या रक्तपेशी वाहिन्यांना चिकटून राहतात त्यामुळे अडथळा निर्माण होऊन त्या भागातील रक्तपुरवठा खंडित होतो यालाच या सिकल सेल ग्रस्त म्हणतात त्यामुळे असह्या वेदना होतात असे इजा वारंवार झाल्यामुळे अवयवाला जबरदस्त इजा होते पण ते अवयवने निकामी होते .नष्ट झालेल्या रक्तपेशी जमा होतात सिकल सेल आजाराच्या रक्तपेशी अडकल्यामुळे प्लिहेवर जबरदस्त सूज येते त्यामुळे त्यांचे कार्यक्षमता कमी होते त्यामुळे आजाराविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता कमी होते रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे आजारचे प्रमाण अधिक वाढते ज्या ज्या भागात रक्तपुरवठा व खंडित होतो त्या भागातील अवयवांना इजा होत असते त्यामुळे सिकल सेल रुग्णाचे हाडे फुफ्फुस यकृत प्लीहा,मेंदू प्रामुख्याने बळी पडून आजाराची गंभीरता वाढते व रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो हे सर्व नकळत होऊन उपचाराला वेळ वेळ मिळत नाही त्याशिवाय डोळे स्वादुपिंड त्वचा पित्ताशय प्रभावित होऊ शकता हा आजार होऊ नये यासाठी जोडप्याने सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा .लाल आणि पिवळे कार्ड असलेल्यांनी आपसात विवाह टाळावा . किंवा सिकल सेल ग्रस्त किंवा वाहक रुग्णांनी निरोगी व्यक्तीशी विवाह करावा. सिकल सेल ग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्याच्या आत गर्भ जल तपासणी करून द्यावे अशा सूचना करण्यात आले आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे सिकल सेल रुग्णांना नियमित आणि समतोल आहार आवश्यक आहे सिकल सेल रुग्णाचे योग्य औषध उपचारणे आयुष्य वाढते सिकल सेल ग्रस्त रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून नियमित तपासणीवर रक्त चाचणीची आवश्यकता असते फॉलिक ऍसिडच्या गोळ्या नियमित येणे सोडामेटच्या गोळ्याचे सेवन महत्त्वाचे असते भरपूर पाणी पिणे वेदनाशामक गोळ्या नियमित घेणे तपासणी व सल्ला घेणे गरज भासल्यास रक्त संक्रमण करणे सिकल सेल रुग्णांनी आहारात विविधता ठेवी दिवसातून तीन वेळा आहार घ्यावा मासे अंडे संत्री हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य शेंगा झिंक असलेले पदार्थ खावा. बोनमॉरो ट्रान्स प्लांट करून आजार पूर्णतः बरा होऊ शकतो असे आहेत मोहिमेचे टप्पे पहिला टप्पा 15ते 20जानेवारी जुन्या रुग्णाची आणि एकदाही तपासणी झालेली नाही यांची यादी आपल्या भागात आरोग्य कर्मचारी व आशा ताई घर भेटीत तयार करणार आहे. दुसरा टप्पा 21ते 26जानेवारी पर्यंत ज्याची सोलूब्लिटी टेस्ट झालेली नाही अशा 0ते 40वयोगटातील व्यक्तीची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल. तिसरा टप्पा 27जानेवारी ते 7फेब्रुवारी ज्याची प्राथमिक चाचणी झाली आहे पण HPLC इलेक्ट्रॉफोरिसिस टेस्ट बाकी आहे अंशाची अंतिम तपासणी केली जाईल. पुढील टप्प्यात 4ते 7फेब्रुवारी दरम्यान सर्व गावामध्ये विवाहपूर्व आणि गर्भधारणे पुर्वी समुपदेशन केले जाणार आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार असून तो पुढच्या पिढीत होऊ नयेत यासाठी ही जनजागृती महत्वाची ठरणार आहे. कुटुंबियांनी आपल्या घरी आलेल्या आरोग्य कर्मचारी, आशा ताई यांना कुटुंबाची पूर्ण माहिती देऊन तपासणी करण्यात यावी जेणेकरून सिकल सेल आजार रोखण्यात यश येऊ शकते असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद सुर्वे व डॉ प्राची पवार डॉ मंजिरी सराफ, डॉ रिद्धी पाटील आपला दवाखाना मिलिंद नगर व दीक्षि चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा जुनागडे यांनीआवाहन केले आहे.