नायलॉन मांजावर बंदी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पक्षी व मानवाच्या जीवाला होणारा धोका याविषयी आपले विचार मुख्याध्यापक रवींद्र हत्ते यांनी मांडले
मकर संक्रांतीचा सण साजरा करताना पर्यावरण व जीवसृष्टीचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे याचे महत्त्व हरित सेना प्रमुख विजय हिरे यांनी सांगितले
शाळेतील विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे तोटे स्पष्ट केले नायलॉन मांजा किती घातक आहे व त्यावर बंदी का आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन पर्यवेक्षक साहेबराव राठोड यांनी केले
नायलॉन मांजावर बंदी या कार्यक्रमा अंतर्गत पतंग बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली
पर्यावरण संरक्षण व नायलॉन मांजाचा वापर न करण्याची शपथ पर्यवेक्षक साहेबराव राठोड यांनी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिली याप्रसंगी सकाळ सत्र व दुपार सत्राचे शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
