प्राथमिक विद्यालय उंटवाडी येथे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती साजरी
नाशिक एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यालय उंटवाडी, शाळेत स्वामी विवेकानंद जयंती व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती, राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमिपूचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली भक्ती भुजबळ ,जुई नंदन,ओवी बऱ्हाटे, हेमांगी पाटील, शिवाय दराडे, हितांशी सोनार , या विद्यार्थ्यांनी भाषणे केली तर गुरुराज सोनार , नंदिनी जाधव या विद्यार्थ्यांनी गोष्टी सांगितल्या. नैतिक महाजन, लोकेश चौधरी, रुद्र जाधव शिवाय दराडे, खुशीका भांडारकर यांनी जिजामाता व विद्यार्थी संवाद सादर केला. ईश्वरी खांडे व शिवाय दराडे यांनी जिजामाता व शिवबा यांच्यातील एक प्रसंग सादर केला. मुख्याध्यापिका यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजेश्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांची गोष्ट सांगून मन कसे एकाग्र करावे याविषयी माहिती सांगितली.सूत्रसंचालन शिवम उन्हवणे याने केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पल्लवी पाटील हिने केले.कार्यक्रमाचे नियोजन तृप्ती बडगुजर यांनी केले होते.कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंखे, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
