माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतले पोलीस कामकाजाचे ज्ञान
सिडको -पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी( वॉक इन टूर ऑफ नाशिक सीपी ) अंतर्गत सिडकोतील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाने दर मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी वॉक इन टूर ऑफ नाशिक सीपी हा उपक्रम सुरू आहे या उपक्रमातर्गत नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयास भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी आयुक्तालयातील आवत जावक शाखा, चारित्र्य व पासपोर्ट पडताळणी शाखा, नियंत्रण कक्ष, डायल ११२, ट्रॅफिक कंट्रोल नियंत्रण कक्ष, वाहतूक नियमांचे जनजागृती आदी कामकाजाची माहिती घेतली यावेळी आ. सरोज अहिरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॅफिक अँबेसेडर चिन्हांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सुधाकर सुरडकर, सय्यद पोलीस आयुक्त संदीप मिटके, अदिव्ता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंतामणी मृदगल, ट्राफिक पोलीस सचिन जाधव शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे आदी उपस्थित होते.
