संत रामपाल जी महाराज यांना हरियाणातील 350 गावांच्या उपस्थितीत "किसान संत गरीबदास गरिमा सन्मानाने केले सन्मानित"
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक: जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचे नाशिक येथील श्रीकृष्ण लॉन्स मध्ये विशाल सत्संगाचे भव्य आयोजन करण्यात आले. आयोजित सत्संगमध्ये जिल्हाभरातून संत रामपाल जी महाराजांचे शेकडो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व अनुयायी मोठ्या श्रध्देने सत्संग श्रवण करत असताना संत रामपाल जी महाराज यांनी हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात अशा अनेक पूरग्रस्त राज्यांमध्ये "अन्नपूर्णा मोहिमे" अंतर्गत मोठ्या प्रमाणात आठ ते दहा फूट साचलेले पुराचे पाणी काढण्यासाठी हजारो फूट पाईप दहा ते पन्नास एचपी पर्यंतच्या असंख्य मोटर्स, जनरेटर एका मागणी पत्रावर उपलब्ध करून देत शेतकऱ्यांचा हिरावलेला घास त्यांना परत मिळवून दिला त्याबद्दल हरियाणा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी वर्ग एकजूट होत अनेक पुरस्कारांनी संत रामपाल जी महाराज यांना सन्मानित करत आहेत त्यापैकी दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी हरियाणातील गिरावड (झज्जर) या ठिकाणी 350 गावे समवेत सरपंच असोसिएशन व अनेक शेतकरी संघटना एकत्र येत ऐतिहासिक असा "किसान संत गरीब दास गरिमा सन्मानाने" य सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये हरियाणा सह देशभरातील दहा लाखाहून अधिक शेतकरी वर्ग तसेच नागरिकांनी हजेरी लावली आणि थेट प्रक्षेपण हरियाणा येथून संपूर्ण भारतासह विदेशातही दाखविण्यात आले असता ठिकठिकाणी लाखोच्या संख्येने प्रेक्षक या ऐतिहासिक सन्मान समारोहाचा हिस्सा बनले. निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी वर्ग तसेच संत रामपाल जी महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत रामपाल जी महाराज जी यांनी उपस्थित शेतकरी तसेच श्रोत्यांना संबोधित करत असताना कोणीही उपाशी पोटी झोपणार नाही. शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अन्न वस्त्र निवारा प्रत्येक दिन दुबळ्या गरीब व्यक्तीला अन्नपूर्णा मोहिमे अंतर्गत प्रदान करण्यात येईल. याकरिता हरियाणासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नपूर्णा मोहिमे अंतर्गत दिन दुबळ्या गरीब पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. "कलियुगमध्ये सतयुग लाऊ, ताते बंदीछोड कहाऊ" या वाणीचा सरळ अर्थ असा आहे की चालू असलेल्या कलियुगामध्ये कोणीही सुखी नाही प्रत्येक व्यक्ती हा दुःखाच्या डोंगराखाली दाबला गेला आहे, त्याला वाचविण्यासाठी स्वतः परमेश्वर धरतीवर संत रामपाल जी महाराज यांच्या रूपात अवतरले आहेत. यांची ओळख प्रत्येक जीव जातीने करून घेऊन आपल्याला मिळालेल्या बहुमोल आयुष्याचे कल्याण करत मोक्षप्राप्तीच्या मार्गावर लागावे. आजचा संपूर्ण मानव समाज शिक्षित असल्यामुळे आपले सदग्रंथ उघडून त्यात दिलेले गुण रहस्य समजून घेत शास्त्र अनुकूल भक्ती करावी मनमाने आचरण सोडावे असे केल्याने आपल्याला सर्व सुख प्राप्त होतील आणि पूर्ण मोक्षाचे आपण भागीदार देखील बनवून असे सत्संगाच्या वेळी संबोधित करण्यात आले.
श्रीम्भगवद्गीते मधील अनेकानेक गूढ रहस्य प्रमानासह दाखवून देत शास्त्र अनुकूल सतभक्ती का करावी व ती केल्याने मनुष्यास काय लाभ होतात आणि शास्त्र विरुद्ध भक्ती केल्याने काय हानी होते हे दाखवून दिले. संत रामपाल जी महाराज हे संपूर्ण जगाला आव्हान करत आहेत की अगोदर प्रत्येकाने हे अद्वितीय गूढ ज्ञान समजून घ्यावे त्याकरिता ज्ञानगंगा व जगण्याचा मार्ग पुस्तक निःशुल्क मागवून त्यातील प्रमाण तपासून नक्की वाचावे आणि मगच उपदेश घ्यावा. उपदेश घेण्या अगोदर संत रामपाल जी महाराज सांगतात "तिनो देवा कमलदल बसे ब्रम्हा, विष्णू, महेश प्रथम इनकी वंदना फिर सून सतगुरू उपदेश" म्हणजेच श्री ब्रम्हाजी, श्री विष्णू जी व श्री शिव जी हे शरीरातील कमल चक्रामध्ये ह्या देवांचा वास असून त्यांची खरी साधना करून मोक्ष प्राप्त करण्याचा विधी हा गीता वेद पुराण मध्ये अगोदरच वर्णित आहे आणि तोच विधी संत रामपाल जी महाराज हे मनमुखी भक्तिविधी न सांगता आपलेच सतग्रंथ उघडून प्रमानासहित दाखवून देतात.
प्रत्येक माणूस हा कुठल्या ना कुठल्या देवी देवतांची मनोभावे भक्ती करत असतो परंतु तरी देखील त्यांच्या आयुष्यात अपार दुःख त्यांना सोसवेच लागतात तर मग हे दुःख आपले देवी देवता दूर का करू शकत नाही. तर याचे एकमेव उत्तर आपल्याच पवित्र श्रीम्भगवद्गीता, चार वेद, सहा शास्त्र, अठरा पुराण यामध्ये दिलेले आहे तेच जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज प्रमाणासहित दाखवून देत आहेत.
जिल्हा विशाल सत्संगमध्ये आलेल्या काही अनुयायांचे अनुभव देखील घेण्यात आले यावेळी त्यांनी आपले अनुभव सांगताना संत रामपाल जी महाराज यांचे द्वारे दिली जाणारी सत भक्ती का योग्य आहे व इतर गुरू, महंत, पंडित, शंकराचार्य यांचे द्वारे दिली जाणारी मनमुखी शास्त्र विरुद्ध भक्तीविधी अयोग्य आणि निष्फळ कशी आहे हे विस्तारपूर्वक सांगितले. याठिकाणी बरेच भक्त असेही होते की ज्यांना महाभयंकर रोगाने घेरलेले असताना एकमेव शास्त्र अनुकूल सत भक्तीने त्यांचा असहाय्य रोग देखील सत मंत्रांच्या जपाने बरा झाला आहे. यावेळी संपूर्ण जगाला संदेश देताना संत रामपाल जी महाराज यांनी असे सांगितले की,
कबीर, माणूष जन्म दुर्लभ है, ये मिले न बारम्बार I
तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लगता डार II
याचा अर्थ असा आहे की, मनुष्य जन्म दुर्लभ आहे, हा वारंवार मिळत नाही, जसे झाडाचे पिकलेले पान गळून पडल्यानंतर पुन्हा झाडाला लागू शकतं नाही अगदी त्याप्रमाणेच आहे त्यामुळे खरे काय आणि खोटे काय याची ओळख आपण शिक्षित असल्यामुळे चांगल्या रीतीने तपासून बघून तत्काळ योग्य निर्णय घ्यावा.
जिल्हा विशाल सत्संगाचे जिल्हा समन्वयक यांनी जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचे आदेशानुसार आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाविक भक्त उपस्थित होते.
सतलोक आश्रम ढवळपुरी महाराष्ट्र कमिटी मेंबर (ट्रस्टी) रमेशदास केकान यांनी सर्व मानव समाजाला जगद्गुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचे द्वारे लिखित अध्यात्मिक ज्ञानगंगा व जगण्याचा मार्ग हे ग्रंथ वाचण अत्यंत गरजेचे का आहे हे सांगितले. दिनांक 27,28 आणि 29 जानेवारी 2026 रोजी सतलोक आश्रम ढवळपुरी जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथे परमेश्वर कबीर साहेब यांच्या निर्वाण दिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या महासमागमामध्ये जिल्ह्यासह भारतातील प्रत्येक व्यक्तीस सहकुटुंब सहपरिवारास सादर आमंत्रित देखील करण्यात आले.
तसेच रोज सकाळी 05:55 वा. ते 06:55 वा. पर्यंत लोकशाही न्यूज चॅनल वर मराठी मध्ये तर सायंकाळी 07:30 वा. ते 08:30 वा. पर्यंत साधना व पॉपकॉर्न चॅनल वर हिंदी मधील सत्संग नक्की बघावे हे अत्यंत गरजेचे आहे कारण मनुष्य जन्माचा मूळ उद्देश हा फक्त शास्त्र अनुकूल सतभक्ती करून मोक्ष प्राप्त करने आहे त्यामुळे प्रत्येकाने आजच हे ग्रंथ निःशुल्क घरपोहोच मागवून आपल्याला मिळालेला अनमोल मनुष्य जन्माचा उद्देश साध्य करवा ही यांचे कडून नम्र विनंती करण्यात आली.
