मराठा विद्या प्रसारक युवास्पंदन २०२६ प्राथमिक फेरी संपन्न
ओझर -मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ओझर मिग येथे मविप्र युवास्पंदन 2026 प्राथमिक फेरी संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून किशोरजी कदम (अध्यक्ष स्थानिक व्यवस्थापन समिती कनिष्ठ महाविद्यालय) उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक फेरीतील सर्व गुणवंत स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या संचालिका शोभाताई बोरस्ते , भागवत बाबा बोरस्ते उपस्थितीत होते.या प्राथमिक फेरीत संस्थेच्या सहा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरी साठी परीक्षक म्हणून तुकाराम तांबे व रोहित दवंडे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी.डी.लोखंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ .पूनम पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.श्रीमती एस. जी.उफाडे यांनी केले.
कार्यक्रमास IQAC समन्वयक डॉ. एम. डी. दुगजे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ डी.एस.बोराडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ . आशा कदम, कला शाखा प्रमुख एस. के. आवारे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
