प्राथमिक विद्यालय उंटवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरी

 प्राथमिक विद्यालय उंटवाडीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरी



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

 नाशिक एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात शाळेच्या जेष्ठ शिक्षिक नेहा बोडखे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात केली. सावित्रीबाई फुले यांच्या जीवण कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी भाषणातून सांगितली.सावित्रीबाई फुलेंच्या बालपणावर आधारित "फुले- सावित्री शिकली नसती तर,पोरगी शिकली असती का" सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्याची माहिती कार्यक्रमाच्या अध्यक्षा दीपमाला चौरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणांचा अवलंब करावा असे मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भक्ती भुजबळ हेने केले.

 कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा ढोन्नर यांनी केले.कार्यक्रमासाठी शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंके अनुराधा घोडेराव तृप्ती बडगुजर दिनेश गवळे,सविता हिरे,वैशाली अंधारे, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post