पेठे विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नाशिक (प्रतिनिधी) –
२६ जानेवारी रोजी शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास व्यासपीठावर शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी, संस्था नियुक्त सदस्य विजय कोठारी,मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी,सहकार्यवाह शैलेश पाटोळे,पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकारी कविता महाले आदी मान्यवर उपस्थित होते.शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी, संस्था नियुक्त सदस्य विजय कोठारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजास मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शपथांचे आयोजन करण्यात होते. साक्षरतेची शपथ उपमुख्याध्यापक शरद शेळके यांनी, गैरमार्गाशी लढा व कॉपीमुक्त शाळेची शपथ मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी, संविधानाची शपथ शैलेश पाटोळे यांनी, तर ध्वजनिष्ठतेची शपथ पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिली.यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, “झेंडा उंचा रहे हमारा” स्काऊट गीत,एन.सी.सी.गीत,भाषणे व मनोगते सादर करून स्वातंत्र्य, समता व बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख करून देत जबाबदार नागरिक बनण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी सामाजिक हित,स्वच्छ भारत अभियान तसेच स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या कार्याचा गौरव करणारा शुभेच्छा संदेश देण्यात आला.देशभक्तीपर गीतांवर आधारित शालेय गीत मंचाद्वारे व अमोल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कवायत घेण्यात आली. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचे महत्त्व, संविधान गाथा,गडकिल्ले आदी विषयांवर तयार केलेल्या हस्तलिखितांचे उद्घाटन व प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,त्याचे वाचन भाऊसाहेब नेहरे यांनी केले. रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार स्पर्धा व रामरक्षा पाठांतर स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक भरत भलकार,पूनम वाल्हेकर यांचा गौरव करण्यात आला.स्काऊट गाईड प्रमुख महेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी“तेरी मिट्टी में मिल जाऊ”हे नाट्यगीत सादर केले. एन.सी.सी. ऑफिसर भरत भलकार यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. विद्यार्थ्यांचे परेड संचलन झाले. वाढदिवस असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना पुष्प व शुभेच्छा देऊन तसेच कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.समारोप प्रसंगी“सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा”व“वंदे मातरम्”या गीतांच्या सामूहिक गायनाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक अमोल जोशी यांनी केले.

