भाजपच्या नगराध्यक्षांसह
नगरसेवकांनी पदभार स्वीकारला
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
ओझर : प्रतिनिधी.
भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा ओझर येथील पगार गवळी मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.नगर परिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, माजी आमदार मंदाकिनी कदम,माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,ओझरच्या नगराध्यक्षा अनिता घेगडमल,गटनेत्या जान्हवी कदम,पिंपळगावचे नगराध्यक्ष डॉ.मनोज बरडे,भागवत बाबा बोरस्ते,शंकरराव वाघ,लक्ष्मण निकम,अनिल भालेराव,सतीश मोरे,गोकुळ गीते,प्रणव पवार, सुवर्णा जगताप,दीपक शिरसाठ,बापू जाधव,मुख्याधिकारी किरण देशमुख, रमेश घुगे,वैकुंठ पाटील,बापूसाहेब पाटील,सचिन मोगल,डॉ.सारिका डेरले,मोतीराम मोगल,महेश पठाडे, जगन कुटे यांसह भाजपचे ओझर व पिंपळगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा अनिता घेगडमल,जान्हवी कदम,रुपाली आढाव,रुपाली महाले,पल्लवी देशमुख, रुपाली शेळके,योगिता कदम,कोमल थूल,रोहिणी जाधव,नेहा जाधव,ज्योती कुंदे,निलेश चौरे, राजू भडके,महेश शेजवळ,नितीन जाधव,अल्ताप अत्तार,खंडेराव जोगरे यांसह सिद्धिविनायक औद्योगिक वसाहतीचे चेअरमन प्रभाकरपंत आढाव, भाजपचे नितीन जाधव,श्रीराम आढाव,प्रकाश महाले,सचिन आढाव,राजेंद्र सोनवणे,दिलीप मंडलिक,युवराज शेळके,श्रीकांत अक्कर,अच्युत आढाव,संतोष जाधव यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक शिरसाठ,बापू जाधव यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी पदभार स्वीकारला.नगरपरिषदेच्या वतीने त्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
