पेठे विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षा सूचीचे वाचन
नाशिक (प्रतिनिधी)- पेठे विद्यालय नाशिक येथे शालेय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली शिक्षा सूची शाळेत अधिकृतपणे वाचन करून जाहीर करण्यात आली.सदर सूचीचे वाचन शाळेच्या सभागृहात मुख्याध्यापक गंगाधर बदादे,उपमुख्याध्यापक शरद शेळके,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी,सहकार्यवाह शैलेश पाटोळे,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत साबळे, उमेश देवरे,भाऊसाहेब नेहरे, बापू चव्हाण,उषा आव्हाड,शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले करण्यात आले. शालेय नियमांचे उल्लंघन, परीक्षेतील गैरप्रकार, शिस्तभंग आदी बाबींचा उल्लेख करत सूची वाचनावेळी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर पदादे यांनी शिस्तीचे महत्त्व, शालेय नियमांचे पालन आणि भविष्यात अशा चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन केले.,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व नैतिक विकासासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत असे पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यार्थ्यांनी यापुढे शिस्तीचे पालन करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन यावेळी शिक्षक प्रशांत साबळे यांनी केले.शाळा व प्रशासनाचा मुख्य उद्देश सुधारात्मक असून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून जबाबदार नागरिक घडविणे हा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. तद प्रसंगी इयत्ता दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
