सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, मेरी शाळेत माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, मेरी शाळेत माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात 




महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी) :सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर,मेरी विभागात येथे( दि.२३ जानेवारी ) रोजी आयोजित माता मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमात वैशाली खिल्लारी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर संस्था कार्यवाह तथा मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी स्वागत व प्रास्ताविकातून मातृशक्तीचे समाजातील व शिक्षणातील महत्त्व अधोरेखित केले.

 विजया दुधारे यांनी मान्यवर अतिथींचा परिचय करून त्यांचा सत्कार केला. यानंतर डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी महिला आरोग्य व संतुलन तसेच विद्यार्थी विकासासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष रंजना परदेशी होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महिलांच्या सहभागाचे व सक्षमीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले.याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या विभाग प्रमुख विजया दुधारे व शालिनी बच्छाव,समीक्षा निकम, निलीमा गायधनी,क्रांती बोराटे,सुरेखा घुले,अनघा कुलकर्णी तसेच पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कोमल जोशी, सदस्या निकुंभ आदी मान्यवर उपस्थित होते.

कविता गजरे यांनी मनोरंजनात्मक खेळ घेतले. सदर कार्यक्रमाप्रसंगी महिला पालकांसाठी लकी ड्रॉ चे विशेष आयोजन करण्यात आले होते.लकी ड्रॉ विजेते घोषित करण्याचे काम सुलक्षणा ठाकरे यांनी केले.या खेळांमुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. याप्रसंगी उपस्थित सर्व माता-भगिनींना तिळगुळ वाटप करून हळदीकुंकू समारंभ संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शालिनी बच्छाव यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कविता खोटरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नम्रता महाले,ललिता गायकवाड,प्रियंका गांगुर्डे,नलिनी पाडवी,गोविंद देशमुख,दिपक नंदन,जगदीश कोतवाल,संजय चौरे,किशोर पारखे, गोटीराम बहिरम,निलीप गावित,यशवंत गावित यांसह सर्व शिक्षकवृंदाने विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमास माताभगिनींची लक्षणीय उपस्थिती लाभली.

Previous Post Next Post