प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत पालक शिक्षक संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

 प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत पालक शिक्षक संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यालय उंटवाडी,शाळेत पालक शिक्षक संघ आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे उपाध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी, तथा अध्यक्ष शालेय समिती. प्रमुख अतिथी सृष्टी देव (माजी विद्यार्थी, अभिनेत्री, समाजसेविका, गोदा स्वच्छता दूत)आरती ओक पा. शि.संघ उपाध्यक्षा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने केली. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या गीतमंच्यानी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे यांनी केले.प्रमुख पाहुणे यांचा परिचय कामिनी तोरवणे यांनी केला.सृष्टी देव यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले,गोदावरी स्वच्छतेची शपथ देऊन शाळेविषयी गौरवोद्वार काढले .कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 इयत्ता-१ली ते ४थीत शाळेतील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी बक्षीसे देऊन गौरव केला.बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे यादिवाचन राजेश्री गायकवाड, हेमलता गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती बडगुजर यांनी केले व आभार दीपमाला चौरे यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंके,लीलावती भोज,नेहा बोडखे,अनुराधा घोडेराव,वैशाली अंधारे शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post